उद्योग व्यवसाय कोणता निवडावा व कसा निवडावा चर्चा

 प्रत्येक उद्योगाची सुरुवात करीत असताना आपण आपलं कौशल्य आपली कुवत आणि त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून योग्य व्यवसायाची निवड करणं हे खूप महत्त्वाचं असतं परंतु बहुतेक वेळा नवीन उद्योजकाला नवीन व्यवसायाची सुरुवात करीत असताना सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे भांडवलाची आणि हे भांडवल उभं करण्यासाठी आर्थिक सक्षम असणं खूप आवश्यक असतं मग आर्थिक सक्षम बनण्यासाठी आपण उद्योगाच्या सुरुवातीला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याबाबतीत थोडासा पण चर्चा करूयात.

      सर्वप्रथम आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून कोणत्याही उद्योगाची सुरुवात आपण लहानात लहान पद्धतीने सुरू करू शकतो समजा आपल्याकडे शेती आहे तर त्या शेतीमध्ये एक छोटी सुरुवात म्हणजे की आपल्या शेतीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वार्षिक विकास सोबतच काही भाजीपाल्याची ही पीक लागवड केले जातात त्या शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीकरिता भाजीपाल्याच्या रोपांची आवश्यकता असते मग आपण एक छोटी सुरुवात म्हणून एक छोट्याशा रोपवाटिकेचे नियोजन आपण करू शकतो विविध प्रकारच्या फळपिकांच्या आणि त्याचबरोबर भाजीपाल्यांच्या जाती ज्या आपल्या भागांमध्ये आपल्या कृषी विद्यापीठांनी निर्देशित केलेल्या असतात अशा वाहनांचा प्रसार करण्यासाठी आपण प्रथम तालुका कृषी अधिकारी कार्यालय याठिकाणी संपर्क करायचा किंवा आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करायचा आणि त्यांच्या माध्यमातून आपण आपल्याशी वारा साठी योग्य असलेलं भाजीपाल्याचा जेव्हां आहे त्याच बियाणं हे उपलब्ध करून घ्यायचा आहे या प्राप्त झालेल्या बियाणांच्या आधारित आपण आपल्या मुबलक क्षेत्रांमध्ये रोपवाटिकेचे नियोजन करायचं आहे रोपवाटिका करण्यासाठी त्या ठिकाणी किती टक्के सावली नंतर त्या ठिकाणी किती प्रमाणात त्या छोट्याशा रोपांना आवश्यक आहे त्याची व्यवस्था पण करून चांगल्या प्रकारच्या रोपांची लागवड आपण करू शकतो परंतु जर आपल्या शेतात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असेल तरच ही रोपवाटिका शक्य आहे यदाकदाचित आपली कोरडवाहू आणि थोडकी शेती असेल तर याच ठिकाणी आपल्याला रोपवाटिकेचे नियोजन हे करता येऊ शकणार नाही त्यासाठी आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे परंतु आपल्या उद्योगाची एक छोटीशी सुरुवात म्हणून आपण या रोपवाटिकेत पासून आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा वापर करून आपण एक उत्पन्न कमी होऊ शकतो आणि त्या प्राप्त उत्पन्नाच्या आधारे मग आपण आपल्या पुढील व्यवसाय उपक्रमासाठी विचार करू शकतो जर आपल्याकडे काही पशुधन उपलब्ध असेल तर आपण दुग्ध व्यवसाय हा हे पर्याय निवडू शकतो त्याचबरोबर दुग्ध व्यवसायाच्या सोबतच आपल्याकडे असलेल्या पशुधनाच्या विष्ठेपासून जे गांडूळ खत निर्मिती केले जाते तर त्याचाही आपल्याला नियोजन करता येऊ शकतं तसेच जे शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे फळभाज्या त्याचबरोबर भाजीपाला आणि वार्षिक पिके घेत असतात आपण त्या शेतकऱ्यांना संपर्क करून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी एकत्रित पर्चेसिंग म्हणजे किती कलेक्टिव्ह पर्चेसिंग करून आपण त्यानंतर योग्य व्यवस्थापन करून आपण त्या शेतमालाला चांगला भाव देऊ शकतो कलेक्टिव पर्चेसिंग मध्ये विविध प्रकारच्या शेतमालाची खरेदी करून आपण मोठ्या मार्केटपर्यंत हा शेतमाल पाठवून चांगला नफा कमवू शकतो शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देऊन आपण त्यातून आपलं कमिशन कमावू शकतो हा ही एक साधा सरळ सोपा उद्योग करण्यास हरकत नाही.

     बऱ्याच ठिकाणी सध्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजेच भाडेतत्त्वावरील शेती हाही उपक्रम अतिशय फायदेशीर ठरलेला आहे आपण भाडेतत्वावर शेती घेऊन त्यामध्ये सध्याच्या मागणी अनुसार पिकांची लागवड करून आपण चांगले उत्पादन घेऊ शकतो उत्पादन आणि उत्पादकता या दोन्ही गोष्टींचा विचार करून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपल्या शेतीमध्ये आपलं उत्पन्न वाढविणे आणि त्यातून नफा कमी होणे याकरिता वेळोवेळी आपण कृषी विभागाशी संपर्क करून योग्य माहिती घेऊन सुरुवात करावी.

संकलन व लेखन- जी व्ही टी.

टिप्पण्या