पोस्ट्स

उद्योग व्यवसाय कोणता निवडावा व कसा निवडावा चर्चा

 प्रत्येक उद्योगाची सुरुवात करीत असताना आपण आपलं कौशल्य आपली कुवत आणि त्याचबरोबर आपली आर्थिक परिस्थिती या सर्व बाबींचा विचार करून योग्य व्यवसायाची निवड करणं हे खूप महत्त्वाचं असतं परंतु बहुतेक वेळा नवीन उद्योजकाला नवीन व्यवसायाची सुरुवात करीत असताना सर्वात मोठी अडचण येते ती म्हणजे भांडवलाची आणि हे भांडवल उभं करण्यासाठी आर्थिक सक्षम असणं खूप आवश्यक असतं मग आर्थिक सक्षम बनण्यासाठी आपण उद्योगाच्या सुरुवातीला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याबाबतीत थोडासा पण चर्चा करूयात.       सर्वप्रथम आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करून कोणत्याही उद्योगाची सुरुवात आपण लहानात लहान पद्धतीने सुरू करू शकतो समजा आपल्याकडे शेती आहे तर त्या शेतीमध्ये एक छोटी सुरुवात म्हणजे की आपल्या शेतीच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वार्षिक विकास सोबतच काही भाजीपाल्याची ही पीक लागवड केले जातात त्या शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीकरिता भाजीपाल्याच्या रोपांची आवश्यकता असते मग आपण एक छोटी सुरुवात म्हणून एक छोट्याशा रोपवाटिकेचे नियोजन आपण करू शकतो विविध प्रकारच्या फळपिकांच्या आणि त्याचबरो...

महिलांनी आता तरी उद्योजकते कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

 आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही शेतकरी कुटुंबाची म्हणून ओळखली जाते. माती सोबत नाळ जोडलेल्या संस्कृतीमध्ये शेती आणि मातीसोबत पशूंची देखभाल हा सुद्धा जोडधंदा म्हणून शेतीत उत्पन्नाचा वाटेकरी ठरला. यातुनच काहींनी क्रांती घडवली, काहींनी ईतिहास रचला. पण, चूल आणि मूल सांभाळ करणारी माता भगिनी मात्र या परंपरेचा साक्षीदार आणि मोलाचा वाटा असणारी अभिव्यक्ती स्वतःच्या अस्तित्वापासून काहीच क्रांती घडवू शकल्या नाहीत ही खंत. कारण अजूनही ग्रामीण भागात परंपरा जपली जाते. हे जरी भारतीय म्हणून योग्य असले तरी सध्या स्पर्धेच्या युगात आणि महागाईच्या युगात आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी शेती सोबत एखादा जोड व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे.        बचत गटाच्या माध्यमातून जशी बचत होत आहे तशी महिलांनी आता उद्योजकतेच्या वाटचालीमध्ये सक्रिय सहभागी होऊन शेती आणि माती सोबत उद्योजकतेची स्वप्ने पूर्ण करत नवीन संकल्पनेवर आधारित श्रमाची व्याख्या करणे आवश्यक आहे. कारण, चीन देश आज उद्योजकतेमुळेच भारताच्या पुढे आहे. अमेरिका रशिया सुद्धा. ही वेगळ्या देशांची उदाहरणे याकरिता देतोय कारण, आता स्पर्धा कधीपर्...

कोरोना काळातील शेतीला जोडधंदा व व्यवसाय सुरुवात

इमेज
नमस्कार, मी गिरीष तिर्थकर. राहनार उस्मानाबाद. मी सर्वसाधारन मध्यम वर्गिय कुटुंबातील एक सुशिक्षित युवक. सध्या जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत उमेद अभियानात प्रभाग समन्वयक या पदावर ढोकी येथे कार्यरत असुन मागिल 7 वर्षांपासुन याच अभियानात महिला सक्षमिकरण विषयी कामकाज करीत आहे. नेहमी काहितरी नवनविन प्रयोग करण्याच्या उद्देशाने  मी समाजाकडुन शिकत असतो. सध्या कोरोना कळात आपल्या सारख्या सुशिक्षित युवकांना उत्पन्नाचे साधन निर्मान करणे व ते सुद्धा जवळचे काही पैसे गुंतवुन हे खुप अवघड काम आहे. मी काहितरी कमावतो त्यामुळे काहितरी करु  शकतो असे काहि नाही. प्रत्येकच व्यक्ति थोडीफार तरी रक्कम कमावतोच फक्त आपल्याला तीच थोडी थोडी एकत्र करायची आहे.. म्हणजे समविचारी व्यक्तिंनी एकत्र येऊन काहितरी नियोजन करायचे आहे व एक बचत गट तयार करायचा आहे, सर्वांकडची थोडी थोडी रक्कम एकत्र करुन मग त्यातुन एकत्रित व्यवसाय निवडुन त्या व्यवसायासाठी आपन काम करायचे आहे. हा व्यवसाय निवडताना आपन शेतीला पुरक असा जोड व्यवसाय निवडावा जेणेकरुन आपल्याला खर्च कमी व नफा जास्त कमावता  यईल. उदा. दुग्धव्यवसाय, दुध डेअरी, शेळी...