कोरोना काळातील शेतीला जोडधंदा व व्यवसाय सुरुवात
नमस्कार, मी गिरीष तिर्थकर. राहनार उस्मानाबाद. मी सर्वसाधारन मध्यम वर्गिय कुटुंबातील एक सुशिक्षित युवक. सध्या जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत उमेद अभियानात प्रभाग समन्वयक या पदावर ढोकी येथे कार्यरत असुन मागिल 7 वर्षांपासुन याच अभियानात महिला सक्षमिकरण विषयी कामकाज करीत आहे. नेहमी काहितरी नवनविन प्रयोग करण्याच्या उद्देशाने मी समाजाकडुन शिकत असतो. सध्या कोरोना कळात आपल्या सारख्या सुशिक्षित युवकांना उत्पन्नाचे साधन निर्मान करणे व ते सुद्धा जवळचे काही पैसे गुंतवुन हे खुप अवघड काम आहे. मी काहितरी कमावतो त्यामुळे काहितरी करु शकतो असे काहि नाही. प्रत्येकच व्यक्ति थोडीफार तरी रक्कम कमावतोच फक्त आपल्याला तीच थोडी थोडी एकत्र करायची आहे.. म्हणजे समविचारी व्यक्तिंनी एकत्र येऊन काहितरी नियोजन करायचे आहे व एक बचत गट तयार करायचा आहे, सर्वांकडची थोडी थोडी रक्कम एकत्र करुन मग त्यातुन एकत्रित व्यवसाय निवडुन त्या व्यवसायासाठी आपन काम करायचे आहे. हा व्यवसाय निवडताना आपन शेतीला पुरक असा जोड व्यवसाय निवडावा जेणेकरुन आपल्याला खर्च कमी व नफा जास्त कमावता यईल. उदा. दुग्धव्यवसाय, दुध डेअरी, शेळीपालन, भाजिपाला लागवड(सेंद्रिय), भाजिपाला खरेदी विक्री व्यवहार, कुक्कुटपालन, गौपालन, रोपवाटीका, गांढुळ खत निर्मिती प्रकल्प, ई. आता आम्ही काय केले या कोरोना काळात यावर आपन रोज चर्चा करनार आहोत, आपन रोज माझे ब्लॉग वाचावा व आपल्या प्रतिक्रिया मला द्याव्या. 95116961529511696152.
या व्यवसायाला सुरुवात ही कोरोना काळात होणे ही सर्वात महत्वाची गोष्ट जेनेकरुन सर्व व्यक्तिन्ना महत्वाचे असलेल्या व आरोग्यपुर्न असलेल्या पंचगव्य औषधे व चिकित्सा या विषयाला महत्व प्राप्त होईल व शेतीला जोडधंदा म्हणुन गौपालन विकसित होईल.
उत्तर द्याहटवा