महिलांनी आता तरी उद्योजकते कडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही शेतकरी कुटुंबाची म्हणून ओळखली जाते. माती सोबत नाळ जोडलेल्या संस्कृतीमध्ये शेती आणि मातीसोबत पशूंची देखभाल हा सुद्धा जोडधंदा म्हणून शेतीत उत्पन्नाचा वाटेकरी ठरला. यातुनच काहींनी क्रांती घडवली, काहींनी ईतिहास रचला. पण, चूल आणि मूल सांभाळ करणारी माता भगिनी मात्र या परंपरेचा साक्षीदार आणि मोलाचा वाटा असणारी अभिव्यक्ती स्वतःच्या अस्तित्वापासून काहीच क्रांती घडवू शकल्या नाहीत ही खंत. कारण अजूनही ग्रामीण भागात परंपरा जपली जाते. हे जरी भारतीय म्हणून योग्य असले तरी सध्या स्पर्धेच्या युगात आणि महागाईच्या युगात आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी शेती सोबत एखादा जोड व्यवसाय उभा करणे आवश्यक आहे.
बचत गटाच्या माध्यमातून जशी बचत होत आहे तशी महिलांनी आता उद्योजकतेच्या वाटचालीमध्ये सक्रिय सहभागी होऊन शेती आणि माती सोबत उद्योजकतेची स्वप्ने पूर्ण करत नवीन संकल्पनेवर आधारित श्रमाची व्याख्या करणे आवश्यक आहे. कारण, चीन देश आज उद्योजकतेमुळेच भारताच्या पुढे आहे. अमेरिका रशिया सुद्धा. ही वेगळ्या देशांची उदाहरणे याकरिता देतोय कारण, आता स्पर्धा कधीपर्यंत आपण आपल्यासोबतच करायची? किमान आतातरी आपण जागतिक विचार बाळगुया , थोडी क्रांती घडवूया. केवळ शेती करून आपली ओळख आपण देशाच्या बाहेर नाही पोचावू शकणार. आपल्याला लोकांच्या गरजा ओळखून उद्योग क्षेत्रात पाऊल ठेऊन काम करणे आवश्यक आहे. हे ओळखून घेऊन जर आपण आपला सक्षम उद्योग निवडला आणि श्रम केले तर एक दिवस यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येऊ हे निश्चित.
सध्या महिलांनाही शासन नवीन उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देत आहे. कारण, ही उद्योजकता आता केवळ आपल्या वैयक्तिक फायद्याची नाही , तर जगामध्ये भारताचे स्थान पक्के करण्याची व जी डी पी वाढवन्याची स्पर्धा आहे. मग या स्पर्धेत जर आपण सहभागी झालो तर आपण खरे योध्ये. जर नाही सहभागी झालो तर, आपण जेथे आहोत तेथेच राहू आणि एक दिवस जगाचा निरोप घेऊ. नंतर आपले अस्तित्व संपले..... पण, एक उद्योजक म्हणून जर मरण आले तर मात्र उद्योग रूपाने आपण निरंतर अजरामर राहू . रोजगार निर्मिती मुळे अनेक बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देऊ, देशाची गरिबी दूर करू..... हा स्वाभिमान बाळगून जर खरी स्पर्धा झाली तर, भारतीय स्त्री ईतिहास घडवू शकेल हे नक्की.
लेखन- जिव्हीटी.
उद्योग मार्गदर्शन तथा योजना माहिती करिता आम्हाला संपर्क करा. प्रत्येक उद्योगाला आर्थिक पाठबळ मिळेल. संपर्क-9420495682.
उत्तर द्याहटवा